इंधन निर्यातीवर बंधने आल्याने जर्मनीत वाहनांवर वेगमर्यादा येणार !

अधिक वेगामुळे अधिक इंधन लागत असल्याने जर्मनीत वाहनांच्या वेगावर मर्यादा आणण्याचा निर्णय तेथील विविध राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांनी एकमुखाने घेतला. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जर्मनीला तेल आणि वायू मिळण्यावर बंधने आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

‘क्रोएशिया’ युरो स्वीकारणारा २० वा देश बनणार !

क्रोएशियन संसदेने १ जानेवारी २०२३ पासून त्यांच्या देशात ‘युरो’ हे चलन स्वीकारणार असल्याचा कायदा संमत केला आहे. यामुळे क्रोएशिया हा युरो चलन स्वीकारणारा युरोप खंडेतील २० वा देश बनणार आहे.

‘मोदी सरकारने मुसलमानविरोधी भावना भडकावणे थांबवावे !’

‘खोटे बोल; पण रेटून बोल’, या नीतीतून अशी विधाने करून भारताला जगभरात अपकीर्त करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश येथे हिंदूंचा वंशसंहार होत आहे, याविषयी हे नेते कधी तोंड उघडतत नाहीत, हे लक्षात घ्या !

अमेरिकाकेंद्रीत जग इतिहासजमा होईल ! – रशिया

आंतरराष्ट्रीय संबंधांविषयी पाश्‍चात्त्य देशांच्या विचारसरणीत स्वार्थ दडला आहे. त्यामुळे पाश्‍चात्त्य देशांचे एकमेकांतील संबंध ताणले जातील आणि लवकरच अमेरिकाकेंद्रीत जग इतिहासजमा होईल, अशी चेतावणी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी येथे केले.

परिणाम भोगायला सिद्ध राहा !

फिनलँड देशाने ‘नाटो’ देशांमध्ये सहभागी होण्याची घोषणा केल्यानंतर रशियाने संताप व्यक्त करत ‘परिणाम भोगायला सिद्ध रहा’ अशी धमकी दिली आहे. फिनलँडची रशियाला लागून जवळपास १ सहस्र ३०० किलोमीटरची सीमारेषा आहे.

जर्मनीत दिवाळखोरीच्या लाटा पहायला मिळणार ! – कॉमर्ज बँक

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अन् त्या अनुषंगाने रशियाच्या तेलावर विविध देशांनी घातलेली बंदी यांचा परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे.

युक्रेनकडून रशियाची युद्धनौका उद्ध्वस्त !

युक्रेनने रशियाची युद्धनौका काळ्या समुद्रात उद्ध्वस्त केेली. स्नेक आयलँडजवळ या युद्धनौकेवर युक्रेनने क्षेपणास्त्रे डागून ती उद्ध्वस्त केली. रात्री केलेल्या आक्रमणात ही नौका समुद्रात बुडवण्यात आली, असा दावा युक्रेनच्या एका खासदाराने केला आहे.

भारताचे आण्विक सामर्थ्य वाढण्यासाठी फ्रान्स करणार साहाय्य

भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ‘स्थायी’ सदस्य मिळण्यासाठी फ्रान्सचा पाठिंबा !

भारत आणि ‘नॉर्डिक’ देशांच्या शिखर संमेलनात पंतप्रधान मोदी सहभागी !

कोरोना महामारीनंतर अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा, हवामान पालट, तसेच जागतिक स्तरावरील सुरक्षेसंबंधीच्या समस्या आदींविषयी यामध्ये चर्चा करण्यात आली.

ब्रिटनच्या संसदेत अश्लील चित्रपट पहाणाऱ्या खासदाराचे त्यागपत्र

त्यागपत्र दिल्यावर ते म्हणाले की, हा माझा वेडेपणा होता आणि मी जे केले, त्याचा मला गर्व नाही. मी मनापासून क्षमा मागतो.