फ्रान्समध्ये तरणतलावात मुसलमान महिलांना ‘बुर्किनी’ घालून पोहण्याला अनुमती नाही ! – न्यायालयाचा निर्णय

(‘बुर्किनी’ म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत शरीर झाकणारा पोहण्याचा पोषाख)

पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्सच्या एका न्यायालयाने यापूर्वी मुसलमान महिलांना समुद्र आणि सार्वजनिक तरणतलाव (स्विमिंग पूल) येथे बुर्किनी घालून पोहण्याची दिलेली अनुमती रहित केली आहे. फ्रान्सचे गृहमंत्री गेराल्ड डारमॅनिन यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून याची माहिती दिली.

ग्रेनोबल शहराच्या महापौरांनी तरणतलावात बुर्किनी घालून पोहण्याची दिलेली अनुमती धर्मनिरपेक्षतेला गंभीररित्या दुर्बल करणारी असल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे, असेही गेराल्ड यांनी म्हटले आहे. फ्रान्समध्ये वर्ष २०१० पासून सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.