शेजारी देश समृद्ध व्हावेत, अशी चीनची इच्छा !

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जावईशोध !

राहुल गांधी आणि स्तंभलेखक श्रुती कपिला

लंडन (इंग्लंड) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारतीय उपखंडात चीनच्या वाढत्या प्रभावाचे समर्थन केले आहे. शेजारी देश समृद्ध व्हावेत, अशी चीनची इच्छा आहे, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसशी संबंधित संघटनांनी आयोजित केलेल्या केंब्रिज विद्यापिठाच्या कार्यक्रमात गांधी वृत्तपत्र स्तंभलेखक श्रुती कपिला यांच्याशी बोलत होते.

शेजारी, विशेषत: भारताच्या संदर्भात वाढती जागतिक शक्ती म्हणून चीनविषयी त्यांचे मत विचारले असता, गांधी यांनी चीनचा बचाव करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. गांधी म्हणाले, ‘सध्या दोन प्रतिस्पर्धी दृष्टीकोन आहेत. एक पाश्‍चात्त्य आहे, भारत हा त्याचा एक भाग आहे. हा सागरी मार्गाचा दृष्टीकोन आहे. दुसरा भूभागाद्वारे व्यापार करण्याचा दृष्टीकोन आहे. या व्यापारावर चीनचे वर्चस्व आहे. चीन त्याच्या शेजारील देशांना समृद्धीचा दृष्टीकोन देत आहे. आम्हाला तुमच्या पायाभूत सुविधा निर्माण करू द्या, असे चीन म्हणत आहे. आम्ही पैसे देऊ, तुम्ही तुमच्या पायाभूत सुविधा निर्माण करा; मग आपण एकत्र समृद्ध होऊ.’ चीनचा हा प्रस्ताव ही एक अतिशय चांगली कल्पना आहे, असे गांधी म्हणाले.

संपादकीय भूमिका

चीनने शेकडो कोटी रुपयांचे कर्ज देऊन श्रीलंकेचा घात केला. त्यामुळेच त्याचे आर्थिक कंबरडे मोडले. नेपाळ आणि पाकिस्तान ही त्याच मार्गाने जात असतांना अशी अविचारी अन् अपरिपक्व विधाने गांधी आणि त्यांच्या काँग्रेसला इतिहासजमा करण्यासाठी पुरेशी आहेत, हे लक्षात घ्या !