गव्हाच्या जागतिक बाजारमूल्याने गाठला विक्रमी उच्चांक !

पॅरिस (फ्रान्स) – भारताने गव्हाची निर्यात रोखल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे मूल्य गगनाला भिडले आहे. युरोपमध्ये त्याचे मूल्य ४३५ युरो (३५ सहस्र ३०० रुपये) प्रती टन झाले आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यावर गव्हाची सर्वाधिक निर्यात करणार्‍या युक्रेनवर आधीच बंधने आली असल्याने गव्हाचे मूल्य वधारले होते. आता दुसरा सर्वांत मोठा निर्यातदार असलेल्या भारतानेही गहू निर्यात करणार नसल्याचे घोषित केल्याने गव्हाने विक्रमी मूल्य गाठले आहे.


एकूणच जागतिक स्तरावर महागाई वाढल्याने गरीब देशांत दुष्काळ आणि सामाजिक असंतोष पहावयास मिळू शकतो, असे सांगण्यात येत आहे. भारताने त्याच्या १.३ अब्ज नागरिकांच्या अन्नसुरक्षेसाठी, तसेच उत्पादनात आलेल्या न्यूनतेमुळे गहू निर्यात न करण्याचा निर्णय १३ मे या दिवशी घेतला आहे.