युरोपात युद्धाचे ढग गडद !

युक्रेनमधील १० शहरांवर रशियाचे आक्रमण !
बेलारूसकडून रशियाला उघडपणे लष्करी बळ !
रशियाविरुद्ध युद्धसज्ज असल्याची ‘नाटो’ची घोषणा !

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ‘अल्ट न्यूज’चे प्रतिक सिन्हा आणि महंमद झुबेर यांचीही नावे !

यावरून हे शांतता पुरस्कार सामाजिक शांतता बिघडवणार्‍यांना दिले जातात का, असा प्रश्न पडतो !

पोप फ्रान्सिस यांच्याकडून रशिया आणि युक्रेन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन !

‘युद्ध कधी कोणत्याही समस्येचे समाधान नाही, तर विनाश आहे, हे आपण किती रक्त सांडल्यावर लक्षात घेणार आहोत ?’, असा प्रश्न त्यांनी विचारला. 

युरोपीय संघातील २७ पैकी १३ देशांकडून स्थलांतरितांना प्रवेशबंदी

गुन्हेगारी वृत्तीच्या मुसलमानांमुळे काय भोगावे लागते, हे युरोपीय देशांना आता कळून चुकले असल्याने त्यांना असा निर्णय घ्यावा लागला आहे. हेच युरोपीय देश भारताला मात्र धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजून अशा मुसलमानांशी चांगला व्यवहार करण्याचे सल्ले देतात !

नोबेल पुरस्कार प्राप्त रोमन बिशपवर लैंगिक शोषणाचा आरोप

प्रतिदिन उघड होणार्‍या अशा घटनांवरून प्रत्येक ख्रिस्ती पाद्र्यांचा आता इतिहास आणि वर्तमान तपासण्याची वेळ आली आहे, असेच कुणालाही वाटेल ! अशा पाद्र्यांना भारतात मात्र शांतीचा पुतळा समजले जाते, हे लक्षात घ्या !

खोटे वार्तांकन थांबवा ! – ब्रिटनमधील हिंदूंची ‘द गार्डियन’च्या कार्यालयासमोर निदर्शने

विदेशी माध्यमांचा हिंदुद्वेष ! ‘हिंदु समाज शांततेवर विश्वास ठेवतो. खोटे वृत्त प्रसिद्ध करणे थांबवा’, ‘द गार्डियन’ने हिंदूंची अपकीर्ती करून त्यांचे जीवन धोक्यात आणणे थांबवावे’, असे सांगणारे फलक निदर्शनांच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले होते.

भारतातील राज्यांमध्ये प्रवास न करण्याची कॅनडा सरकारची त्यांच्या नागरिकांना सूचना

भारताने सूचना केल्यामुळेच आता कॅनडाने त्याच्या नागरिकांना ही सूचना केल्याचे लक्षात येते ! अन्य देश भारताला जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात, तर भारत गांधीगिरी दाखवण्यात धन्यता मानतो, असा आतापर्यंतचा इतिहास आहे. तो आता पालटण्याची आवश्यकता आहे !

पाकच्या महिला मंत्र्याच्या विरोधात लंडनच्या रस्त्यावर पाकिस्तानी नागरिकांकडून ‘चोर चोर’ म्हणत घोषणाबाजी

पाकिस्तानच्या मंत्री मरियम औरंगजेब यांना येथे पाकिस्तानी नागरिकांकडून विरोध करण्यात आला. येथील एका कॉफी शॉपमध्ये पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या समर्थकांनी मरियम यांना उद्देशून ‘चोर चोर’ अशा घोषणा दिल्या.