पोप फ्रान्सिस यांच्याकडून रशिया आणि युक्रेन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन !

ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी – ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पुन्हा एकदा रशिया आणि युक्रेन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. ते येथे एका प्रार्थनेच्या पूर्वी केलेल्या भाषणात बोलत होते.

पोप फ्रान्सिस म्हणाले की, हे युद्ध आता गंभीर, विनाशकारी आणि धोकादायक झाले आहे. याचा परिणाम केवळ याच देशांवर नाही, तर संपूर्ण जगावर होत आहे. ही स्थिती अणूयुद्धाचा धोका निर्माण करते. यामुळे संपूर्ण जगामध्ये विनाशकारी परिणाम होण्याची शक्यता वाढते. ‘युद्ध कधी कोणत्याही समस्येचे समाधान नाही, तर विनाश आहे, हे आपण किती रक्त सांडल्यावर लक्षात घेणार आहोत ?’, असा प्रश्न त्यांनी विचारला.