रशियाकडून युक्रेनवर ७५ क्षेपणास्‍त्रांद्वारे आक्रमण

शेकडो लोकांचा मृत्‍यू  

कीव (युक्रेन) – रशियाने युक्रेनची राजधानी कीव समवेत अनेक शहरांवर ७५ क्षेपणास्‍त्रांद्वारे आक्रमण केले. यात शेकडो लोकांचा मृत्‍यू झाल्‍याचा दावा युक्रेनचे राष्‍ट्रपती झेलेंस्‍की यांनी केला. रशियाने या आक्रमणासाठी १२ आत्‍मघाती इराणी ड्रोनचा वापर केला.

रशियाने डागलेल्‍या ७५ पैकी ४१ क्षेपणास्‍त्रे युक्रेनच्‍या वायूदलाने हवेतच नष्‍ट केल्‍याचा दावा करण्‍यात आला आहे. झेलेंस्‍की म्‍हणाले की, रशिया आम्‍हाला, तसेच पृथ्‍वीचा चेहरा नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न करत आहे.