खोटे वार्तांकन थांबवा ! – ब्रिटनमधील हिंदूंची ‘द गार्डियन’च्या कार्यालयासमोर निदर्शने

मुसलमान कट्टरवाद्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप

लीसेस्टर हिंसाचारासाठी हिंदूंना दोष देत पक्षपाती अहवाल दिल्याबद्दल गार्डियन कार्यालयाबाहेर हिंदूंनी निषेध केला !

लंडन – ब्रिटनमध्ये मुसलमान जमावाने हिंदूंच्या विरोधात हिंसाचार केला. यावर ‘बीबीसी’, ‘द गार्डियन’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी हिंदूंसाठी आवाज उठवण्याऐवजी त्यांना अपकीर्त केले आणि मुसलमान कट्टरवाद्यांना संरक्षण देण्यासाठी पक्षपाती वार्तांकन केले. लिसेस्टरमधील हिंदूंच्या विरोधातील हिंसाचाराचे पक्षपाती वार्तांकन केल्याचा आरोप करत भारतियांनी ‘द गार्डियन’च्या कार्यालयासमोर निदर्शने केली. मीडिया संस्था मुसलमान कट्टरवाद्यांना संरक्षण देत आहे, असा आरोप या वेळी करण्यात आला.

‘हिंदु समाज शांततेवर विश्वास ठेवतो. खोटे वृत्त प्रसिद्ध करणे थांबवा’, ‘द गार्डियन’ने हिंदूंची अपकीर्ती करून त्यांचे जीवन धोक्यात आणणे थांबवावे’, असे सांगणारे फलक निदर्शनांच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले होते.

‘द गार्डियन’ने ‘हिंदु राष्ट्रवाद’विषयी विकृत व्याख्या देणारा एक लेख प्रसिद्ध केला होता आणि त्याला ब्रिटनमधील हिंसाचारासाठी उत्तरदायी धरले होते.

संपादकीय भूमिका

विदेशी माध्यमांचा हिंदुद्वेष !