नोबेल पुरस्कार प्राप्त रोमन बिशपवर लैंगिक शोषणाचा आरोप

व्हॅटिकन करणार चौकशी

रोमन बिशप कार्लाेस फिलिपे जिमेनेस बेलो

व्हॅटिकन सिटी – नोबेल पुरस्कार प्राप्त ७५ वर्षीय रोमन बिशप कार्लाेस फिलिपे जिमेनेस बेलो यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आला आहे. नेदरलँड्स येथील एका नियतकालिकामध्ये याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तानंतर व्हॅटिकनने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. बेलो  १९८० आणि ९० च्या दशकात दक्षिण-पूर्व आशियातील पूर्व तिमोर या देशात बिशप असतांना ही घटना घडली. तेथे त्यांनी अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. ज्या मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आले, त्यांना बेलो यांनी पैसे दिले; कारण त्या गरीब घरातील होत्या. याविषयी या मुलींच्या कुटुंबियांनी सांगितले की, त्या घाबरलेल्या होत्या; कारण बेलो ज्या चर्चमध्ये होते, ते चर्च येथील प्रसिद्ध आणि सन्माननीय होते.

वर्ष १९७५ ते ९९ पर्यंत पूर्व तिमोर देशावर इंडोनेशियाचे राज्य होते. या काळात तेथे मोठा नरसंहार झाला होता. या काळात बेलो यांनी तिमोरमध्ये अहिंसक मार्गाने अभियान राबवले होते. त्यामुळेच त्यांना वर्ष १९९६ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

प्रतिदिन उघड होणार्‍या अशा घटनांवरून प्रत्येक ख्रिस्ती पाद्र्यांचा आता इतिहास आणि वर्तमान तपासण्याची वेळ आली आहे, असेच कुणालाही वाटेल ! अशा पाद्र्यांना भारतात मात्र शांतीचा पुतळा समजले जाते, हे लक्षात घ्या !