नोबेल शांतता पुरस्कारासाठी ‘अल्ट न्यूज’चे प्रतिक सिन्हा आणि महंमद झुबेर यांचीही नावे !

महंमद झुबेर याच्यावर आहे दोन धर्मांत तेढ निर्माण केल्याचा गुन्हा !

डावीकडून महंमद झुबेर आणि प्रतिक सिन्हा

ओस्लो (नॉर्वे) – येथे शांततेच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे. ‘रायटर्स’ या वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणानुसार शांततेच्या नोबेल पुरस्कारांसाठी आघाडीवर असलेल्या नावांमध्ये भारतातील वृत्तसंकेतस्थळ ‘अल्ट न्यूज’चे संस्थापक प्रतिक सिन्हा आणि महंमद झुबेर यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना, म्यानमारची राष्ट्रीय एकता सरकार, बेलारुसच्या विरोधी पक्षनेत्या सिवतलाना यांची नावेदेखील आघाडीवर आहेत. यापूर्वी भारतातील मदर तेरेसा आणि कैलाश सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे.

१. महंमद झुबेर याला काही आठवड्यांपूर्वी नूपुर शर्मा यांचा महंमद पैगंबर यांच्याविषयीचा कथित अवमानकारक विधान असणारा एका चर्चासत्राचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्यावरून अटक करण्यात आली होती. नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

२. अमेरिकेतील ‘टाइम’ नियतकालिकाने म्हटले आहे की, प्रतिक सिन्हा आणि महंमद झुबेर भारतात खोट्या बातम्यांमागील तथ्य शोधून काढून सत्य समोर आणण्यासाठी संघर्ष करत आहेत. सिन्हा आणि झुबेर सामाजिक माध्यमांवर नियोजनबद्धरित्या पसरवण्यात आलेल्या खोट्या बातम्या रोखण्याचा प्रयत्न करतात. (अमेरिकी वृत्तपत्रांचा हिंदुद्वेष ! – संपादक)

संपादकीय भूमिका

यावरून हे शांतता पुरस्कार सामाजिक शांतता बिघडवणार्‍यांना दिले जातात का, असा प्रश्न पडतो !