स्थलांतरितांमध्ये बहुसंख्य मुसलमानांचा समावेश
नवी देहली – युरोप खंडातील देशांच्या युरोपीय संघामध्ये असलेल्या २७ पैकी १३ देशांनी स्थलांतरितांना त्यांच्या देशात येण्यास बंदी घातली आहे. या स्थलांतरितांमध्ये मुसलमान देशातून येणार्या मुसलमानांची संख्या अधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून या मुसलमानांनी युरोपमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला, तसेच सामाजिक सौहार्दतेला बाधा पोचवल्यामुळे तेथील जनतेमध्ये संताप आहे. त्यातच या १३ देशांमध्ये आता राष्ट्रवादी विचारसरणीच्या पक्षांचे सरकार सत्तेत आल्यामुळे त्यांच्याकडून ही बंदी घालण्यात आल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी पक्षांचा वाढता दबदबा पहाता अन्य देशांतदेखील राष्ट्रवादी पक्षांना वाढता पाठिंबा मिळू शकतो, असा अंदाज युरोपीय संघाच्या अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे. या देशांतही राष्ट्रवादी सरकारे सत्तेवर येऊ शकतात.
मुसलमान स्थलांतरितांमुळे गुन्हेगारीत वाढ !
युरोपीय संघातील विकसित देशांत येणार्या स्थलांतरित मुसलमानांमुळे तेथील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. स्वीडनमध्ये ५ वर्षांत तुलनेने गुन्हेगारी ६० टक्क्यांनी वाढली, तसेच लोकसंख्येची घनता अधिक असलेल्या भागात स्थलांतरित मुसलमान वास्तव्याला असल्याने धार्मिक आणि सामाजिक संतुलन बिघडले. फ्रान्समधील अनेक शहरांत सामाजिक सौहार्दची स्थिती बिघडलेली आहे.
संपादकीय भूमिकागुन्हेगारी वृत्तीच्या मुसलमानांमुळे काय भोगावे लागते, हे युरोपीय देशांना आता कळून चुकले असल्याने त्यांना असा निर्णय घ्यावा लागला आहे. हेच युरोपीय देश भारताला मात्र धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजून अशा मुसलमानांशी चांगला व्यवहार करण्याचे सल्ले देतात ! काश्मीरमध्ये मुसलमानांनी केलेल्या हिंदूंच्या अत्याचारांविषयी नेहमीच मात्र या देशांनी मौन बाळगले आहे, हे लक्षात घ्या ! |