कोल्हापूर महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती !

कोल्हापूर महानगरपालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबर या दिवशी संपली. यामुळे महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील औषध पुरवठादारांची सरकारकडे अनुमाने १७० कोटी रुपयांची रक्कम थकीत

सरकारी रुग्णालयांना लागणारा औषधांचा पुरवठा करूनही महाराष्ट्रातील पुरवठादारांची सरकारकडे अनुमाने १७० कोटी रुपयांची रक्कम थकीत राहिली आहे

पुण्यात ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे आतापर्यंत ६ कोटी डोस सिद्ध

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये कोरोना लसीचे आतापर्यंत ६ कोटी डोस सिद्ध केले आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात देशातील ३० कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे.

हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

अभय बनसोडे या आरोपीने ओळखीचा अपलाभ घेऊन १३ नोव्हेंबर या दिवशी १७ वर्षीय तरुणीला घरी सोडतो, असे खोटे सांगून ‘लॉज’वर नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. बलात्कार्‍यांना तत्काळ आणि कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !

देहलीमध्ये जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना अटक

देहली पोलिसांच्या विशेष पथकाने जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

कर्नाटकातील किष्किंधामध्ये हनुमानाची २१५ मीटर उंच मूर्ती स्थापन करण्यात येणार

कर्नाटकच्या जगप्रसिद्ध हम्पी येथील ‘हनुमद जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे प्रमुख स्वामी गोविंद आनंद सरस्वती यांनी कर्नाटकच्याच पम्पापूर किष्किंधा येथे भगवान हनुमानाची २१५ मीटर उंच मूर्ती लावण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

धार्मिक टोपी घातल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलंबित

आसाम पोलिसांच्या बिनतारी संदेश वहन विभागातील उपनिरीक्षक महंमद शौकत अली याला कामावर असतांना धार्मिक गोल टोपी घातल्याच्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेची आत्मज्योत प्रत्येकाच्या हृदयात जागृत करूया ! – निरंजन चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

धर्म हा राष्ट्राचा पाया असून तोच सर्वश्रेष्ठ आहे. धर्मावर आपली दृढ श्रद्धा असली पाहिजे. देवतांचे होणारे विडंबन आणि देव-देश-धर्म यांची होणारी हानी रोखण्यासाठी आपण सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करायला पाहिजेत.

कोल्हापूर येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर शिवसेनेच्या वतीने प्रतिमा पूजन आणि अभिवादन !

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहर शिवसेनेच्या वतीने प्रतिमा पूजन आणि अभिवादन करण्यात आले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या मूर्तीस अभ्यंगस्नान

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूरच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे दीपावली पाडव्याच्या निमित्ताने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीस अभ्यंगस्नान घालण्यात आले.