कर्नाटकातील किष्किंधामध्ये हनुमानाची २१५ मीटर उंच मूर्ती स्थापन करण्यात येणार

अयोध्या (उत्तरप्रदेश) – कर्नाटकच्या जगप्रसिद्ध हम्पी येथील ‘हनुमद जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’चे प्रमुख स्वामी गोविंद आनंद सरस्वती यांनी कर्नाटकच्याच पम्पापूर किष्किंधा येथे भगवान हनुमानाची २१५ मीटर उंच मूर्ती लावण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. किष्किंधा हे सुग्रिवाचे राज्य होते. स्वामी गोविंद आनंद सरस्वती यांनी अयोध्येत श्रीराममंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली. ‘या मूर्तीसाठी १ सहस्र २०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी संपूर्ण देशातून दान घेण्यासाठी रथ यात्रा काढण्यात येईल’, असेही त्यांनी सांगितले.