पुण्यात ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचे आतापर्यंत ६ कोटी डोस सिद्ध

पुणे – कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सिरम इन्स्टिट्यूट’मध्ये कोरोना लसीचे आतापर्यंत ६ कोटी डोस सिद्ध केले आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात देशातील ३० कोटी लोकांना लस देण्यात येणार आहे. ही लस सर्वसामान्यांना कधी उपलब्ध होईल, याविषयी मात्र अद्याप चित्र स्पष्ट नाही.