देहलीमध्ये जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना अटक

देहलीमध्ये करणार होते आतंकवादी आक्रमण

अशांना आयुष्यभर पोसत रहाण्यापेक्षा त्यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष पथकाने जैश-ए-महंमदच्या २ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. ते देहलीमध्ये आतंकवादी आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या त्यांची चौकशी केली जात आहे. हे दोघेही जम्मू-काश्मीरचे निवासी आहेत.  यातील एकाचे नाव अब्दुल लतिफ मीर (वय २२ वर्षे) आणि दुसर्‍याचे महंमद अशरफ खतना (वय २० वर्षे) अशी आहेत.