हडपसरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार !

बलात्कार्‍यांना तत्काळ आणि कठोर शिक्षा झाल्याविना अशा घटना थांबणार नाहीत !

पुणे (हडपसर) – अभय बनसोडे या आरोपीने ओळखीचा अपलाभ घेऊन १३ नोव्हेंबर या दिवशी १७ वर्षीय तरुणीला घरी सोडतो, असे खोटे सांगून ‘लॉज’वर नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो पळून गेला. पीडित तरुणीनेे हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात पोहचल्यावर बाहेरच ती बेशुद्ध पडली. पोलिसांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. शुद्धीवर आल्यावर पीडित तरुणीने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली आहे, सध्या पीडितेवर उपचार चालू आहेत.