धार्मिक टोपी घातल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलंबित

गौहत्ती (आसाम) – आसाम पोलिसांच्या बिनतारी संदेश वहन विभागातील उपनिरीक्षक महंमद शौकत अली याला कामावर असतांना धार्मिक गोल टोपी घातल्याच्या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. टोपी घातलेले त्यांचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे.