ऊस आंदोलनाची ठिणगी भडकली

एकरकमी ‘एफ्आर्पी’च्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात आंदोलन चालू केले आहे. पलूस तालुक्यातील क्रांती साखर कारखान्याचे घोगाव येथील कार्यालय पेटवून दिलेे.

अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या बहिणीला अमली पदार्थविरोधी पथकाकडून समन्स

अमली पदार्थांची बजबजपुरी असलेली हिंदी चित्रपटसृष्टी !

भूसर्वेक्षणास विरोध करणार्‍या मेळावली ग्रामस्थांवर पोलिसांचा लाठीहल्ला आणि अश्रूधुराचा वापर : ग्रामस्थांकडूनही दगडफेक

शेळ-मेळावली येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनाला ६ जानेवारी या दिवशी हिंसक वळण लागले. प्रस्तावित आयआयटी प्रकल्पासाठीच्या भूमीच्या सर्वेक्षणाचे काम ग्रामस्थांच्या तीव्र विरोधामुळे ६ जानेवारी या दुसर्‍या दिवशी भूसर्वेक्षण अधिकार्‍यांना बंद करावे लागले.

पाकमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांची माहिती देणारे मानाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांच्यावर प्राणघातक आक्रमण

धर्मांधांची जिहादी वृत्ती उघड करणार्‍यांना धर्मांध कधीतरी जिवंत ठेवतील का ? असे धर्मांध मानवतेचे शत्रू असून जगाने आता त्यांच्याविरोधात संघटित होऊन त्यांचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि भारताने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे !

सांखळी येथील बसवराज मुचंडी याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा प्रविष्ट

सांखळी येथे ‘लॉकडाऊन’ या शीर्षकाखाली एक ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गट कार्यरत आहे. या गटात हिंदु देवतांची अश्‍लील छायाचित्रे प्रसारित केल्याच्या प्रकरणी सांखळी येथील बसवराज मुचंडी याच्या विरोधात पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा प्रविष्ट करून त्याला कह्यात घेतले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासामध्ये पत्रकारांचे मोठे योगदान ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील पत्रकार परिवर्तनाचे काम करत आहेत, तसेच जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे आयोजित पत्रकार दिन आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलतांना केले.

इंग्लंड येथून परतलेल्या आणि ‘इ.एस्.आय.’ रुग्णालयात अहवालाच्या प्रतिक्षेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आंदोलनाचा पवित्रा

इंग्लंड येथून परतलेल्या आणि मडगाव येथील ‘इ.एस्.आय.’ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हे रुग्ण नवीन कोरोना विषाणूसंबंधीच्या पुणे येथील प्रयोगशाळेच्या अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.

रोहिंग्या आणि आतंकवाद्यांना अर्थपुरवठा यांप्रकरणी उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाच्या धाडी

रोहिंग्या आणि आतंकवाद्यांना अर्थपुरवठा यांप्रकरणी उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील गोरखपूर, खलीलाबाद, अलीगड, बस्ती, आणि अन्य काही जिल्ह्यांमध्ये धाडी घातल्या.

तिनईघाट ते करंझोळ रेल्वेमार्गाच्या दुपरीकरणाला ‘वन्यजीव मंडळा’ची मान्यता ! – प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरणमंत्री

दक्षिण-पश्‍चिम रेल्वेमार्गावरील तिनईघाट-केसलरॉक-करंझोळ या रेल्वेमार्गाच्या दुपरीकरणाला ‘वन्यजीव राष्ट्रीय मंडळा’ने मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.