केंद्राकडून शिष्यवृत्तीसाठी ५९ सहस्र कोटी रुपयांची तरतूद ! – सुनील कांबळे, भाजप

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने ५९ सहस्र रुपयांची तरतूद केली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. असे असतांना विरोधक केंद्र सरकारवर खोटा आरोप करत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनिल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केले.

बीड जिल्ह्यात २ दिवसांत २६ कावळ्यांचा मृत्यू

देशातील ६ राज्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट होत असतांना पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे २ दिवसांत २६ कावळे मृतावस्थेत आढळले आहेत.

नव्या धोरणानुसार आमदार वैभव नाईक यांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था

राज्य सरकारने राज्यातील राजकीय नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पालट केला असतांनाच काही नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ, तर काही नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे.

अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे

मार्च मासाच्या अखेरीस नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी संभाजीनगरमध्ये ८ जानेवारी या दिवशी केली.

गोव्यात कोरोना लसीकरण १६ जानेवारीपासून चालू होण्याची शक्यता

देशासमवेत गोव्यातही कोरोना लसीकरण १६ जानेवारीपासून चालू होण्याची शक्यता असून लसीकरणासाठी राज्यातील ८ रुग्णालये निवडण्यात आली आहेत.

राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा शासनाचा निर्णय

जनतेच्या करातून सर्वच राजकीय नेत्यांना दिल्या जाणार्‍या सुरक्षा व्यवस्थेतून जनतेच्या निधीचा अपव्यय होत नाही ना ? याचाही विचार व्हायला हवा !

पतंजली योग समितीच्या वतीने १२ जानेवारी या दिवशी बांदा येथे ‘सूर्यनमस्कार दिन’

येथील बांदा पंचक्रोशी पतंजली योग समिती आणि गोवा राज्य पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून १२  जानेवारी या दिवशी बांदा येथे ‘सूर्यनमस्कार दिन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे पोलिसांकडून गुजरात येथे धाड घालून कोट्यवधींचा गुटखा जप्त

गुटखा विक्रेत्याच्या गुजरात, तसेच दादरा आणि नगर हवेली येथील सिल्वासा येथील ‘काशी व्हेंचर्स’ या आस्थापनावर धाड घालत १५ कोटी रुपयांचा गुटखा आणि त्यासाठीचा कच्चा माल जप्त केला.

कोरोनाविषयक चाचण्यांच्या दराविषयी अधिसूचना लागू

कोरोनासंदर्भातील वैद्यकीय चाचण्यांचे दर शासनाने अधिसूचनेद्वारे घोषित केले आहेत. शासकीय आणि खासगी रुग्णालयांसाठी हे दर समान असतील. पूर्ण स्वयंचलित ‘आर्टी-पीसीआर्’ चाचणीसाठी २ सहस्र ४३० रुपये आकारले जातील.

पेण बलात्कार प्रकरणाचा खटला अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी लढवावा – मनसे

पेण शहरातील आदिवासी पाड्यात रहाणार्‍या ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍यात आली. या बलात्कार प्रकरणाचा खटला अधिवक्ता उज्ज्वल निकम यांनी लढवावा, अशी मागणी मनसेने केली आहे.