नव्या धोरणानुसार आमदार वैभव नाईक यांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था

वैभव नाईक

कणकवली – राज्य सरकारने राज्यातील राजकीय नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पालट केला असतांनाच काही नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ, तर काही नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात कुडाळचे आमदार वैभव नाईक यांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

पोलिसांकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार राज्याच्या समितीकडून ही सुरक्षाव्यवस्था पुरवण्याविषयी शिफारस करण्यात येते.