८ रुग्णालयांची निवड
पणजी – देशासमवेत गोव्यातही कोरोना लसीकरण १६ जानेवारीपासून चालू होण्याची शक्यता असून लसीकरणासाठी राज्यातील ८ रुग्णालये निवडण्यात आली आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालय, मडगाव येथील हॉस्पिसियो, म्हापसा येथील आझिलो, वास्को येथील चिखली आरोग्य केंद्र, फोंड्यातील उपजिल्हा रुग्णालय, मणिपाल रुग्णालय, जुने गोवे येथील हेल्थवे आणि मडगाव येथील व्हिक्टर हॉस्पिटल ही रुग्णालये असतील. याविषयी ११ जानेवारीला सर्व संबंधित खात्यांसमवेत मुख्यमंत्री डॉ. सावंत बैठक घेणार आहेत. या बैठकीत कोरोना लसीकरणाविषयीच्या सिद्धतेचा आढावा घेण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यासमवेत लसीकरणाविषयीच्या सिद्धतेविषयी जाणून घेण्यासाठी ‘व्हर्च्युअल’ माध्यमाद्वारे बैठक घेणार आहेत.