पुणे पोलिसांकडून गुजरात येथे धाड घालून कोट्यवधींचा गुटखा जप्त

पुणे – राज्यात गुटखाबंदी असूनही शहरात गुटख्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुणे पोलिसांच्या ‘युनिट चार’च्या पथकाने मुख्य गुटखा विक्रेत्याच्या गुजरात, तसेच दादरा आणि नगर हवेली येथील सिल्वासा येथील ‘काशी व्हेंचर्स’ या आस्थापनावर धाड घालत १५ कोटी रुपयांचा गुटखा आणि त्यासाठीचा कच्चा माल जप्त केला.

राज्यात गुटखाबंदी असतांना शहरात त्याची विक्री होत असल्याने पुणे पोलिसांनी मागील दोन मासांत २८ ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा जप्त केला आहे. या धाडीच्या वेळी गुटखा व्यवसायातून होणारी आर्थिक उलाढाल हवालाच्या माध्यमातून  होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यातून हवालाद्वारे व्यवहार करून देणार्‍या पाच ठिकाणांवर धाडी टाकून ४ कोटी रुपये जप्त केले आहेत. ही भारतातील गुटखा उद्योगावरील आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल यांनी सांगितले.