बीड – देशातील ६ राज्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट होत असतांना पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे २ दिवसांत २६ कावळे मृतावस्थेत आढळले आहेत.
प्रारंभी ग्रामस्थांनी याकडे दुर्लक्ष केले; मात्र अनेक कावळे मृत्यूमुखी पडलेले दिसल्यानंतर ग्रामस्थांनी सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राचे प्रमुख सिद्धार्थ सोनवणे यांना माहिती दिली. त्यांनी पशूवैद्यकीय अधिकार्यांशी संपर्क साधला असता अधिकार्यांचे पथक गावात आले. या पथकाने परिसराची पाहणी करून मृत कावळ्यांना कह्यात घेतले.