राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा शासनाचा निर्णय

जनतेच्या करातून सर्वच राजकीय नेत्यांना दिल्या जाणार्‍या सुरक्षा व्यवस्थेतून जनतेच्या निधीचा अपव्यय होत नाही ना ? याचाही विचार व्हायला हवा !

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे नेते प्रसाद लाड, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, संजय बनसोडे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. मुंबईचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याविषयी शासन सूडबुद्धीचे राजकारण करत असल्याची टीका केली आहे.