(म्हणे) ‘पंतप्रधान मोदी आतंकवादी !’ – पाकचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा महंमद आसिफ

सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रात पाकवर आतंकवादी कृत्यांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला; मात्र भारताच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीच आतंकवादी आहे.

मुख्यमंत्री विजयन् उत्तरदायी ! – अमित शहा

राज्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या १२० हून अधिक कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या झाली आहे. त्याला मुख्यमंत्री विजयन् थेट उत्तरदायी आहेत, असा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

धौलपूर (राजस्थान) येथे डीजे वाजवल्यावरून धर्मांधांचे दुर्गा उत्सवावर आक्रमण

येथील गीसुक्खा गावामध्ये डिजे वाजवण्यावरून धर्मांधांनी दुर्गा उत्सवावर आक्रमण केल्याची घटना समोर आली आहे. यात २ महिलांसहित ६ जण घायाळ झाले.

भाग्यनगरमध्ये मुसळधार पावसामुळे ३ जणांचा मृत्यू

येथे २ ऑक्टोबरला सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. यात ३ जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी ६७.६ मि.मी. इतका विक्रमी पाऊस पडला.

#InjusticeOnHindus हा ट्रेंड भारताच्या पहिल्या १० ट्विटर ट्रेंडमध्ये ५ व्या क्रमांकावर  

आज हिंदूबहुल भारतात हिंदूंवर ठिकठिकाणी अन्याय होत असल्याचे दिसून येते. नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत हिंदूंचे विविध सण मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात.

एकविरादेवी मंदिराच्या सोन्याच्या कळसाची चोरी

कार्ला गडावरील एकविरादेवीच्या मंदिरावरचा कळस २ ऑक्टोबरला मध्यरात्री चोरीला गेला. या कळसाला सोन्याचा मुलामा दिलेला होता. एका भक्ताने हा सोन्याचा मुलामा असलेला कळस दिला होता

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रवचन, स्वसंरक्षण प्रात्यक्षिके आणि फ्लेक्स प्रदर्शन यांना धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवरात्रोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांंमध्ये आदर्श नवरात्रोत्सव साजरा होण्यासाठी मंडळांमधून आणि वैयक्तिक स्तरावर देवीपूजनाचे शास्त्र समजावे यासाठी प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते.

नागपूर जिल्ह्यातील ५४ अवैध शाळांवर कारवाई करण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

जिल्ह्यातील ५४ अवैध शाळांवर कारवाई करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना दिला.

नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून डिजिटल शिक्षणाची सुविधा

नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाची सुविधा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून ही सुविधा मिळणार असून सर्व वर्ग डिजिटल करण्यासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

संस्थाचालकांना अवमान नोटीस बजावण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन आणि भत्ते मिळावेत, यासाठी प्रविष्ट करण्यात आलेल्या अवमान याचिकेत शिक्षण संस्थाचालकांना अवमान नोटीस बजावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने दिला आहे.


Multi Language |Offline reading | PDF