
नागपूर – विदेशींच्या आक्रमणांमुळे आयुर्वेदाचा प्रसार रोखला गेला होता. आता आयुर्वेदाला पुन्हा मान्यता मिळत आहे. आयुर्वेदाचा प्रसार करण्याची वेळ आली आहे. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळण्यासाठी पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी १२ नोव्हेंबर या दिवशी येथे व्यक्त केले.
परकीय आक्रमणानंतर आयुर्वेदाचे महत्त्व घटले; सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादनhttps://t.co/AKS96Bs07s#rss #mohanbhagwat #Ayurveda #declined #importance
— LoksattaLive (@LoksattaLive) November 13, 2022
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या सहकार्याने ३ दिवसीय ‘आयुर्वेद पर्व’ आणि आंतरराष्ट्रीय परिषद यांचे आयोजन पूर्व नागपूर येथील सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
(सौजन्य : ucn news)