बडनेरा येथे ‘लव्ह जिहाद’प्रकरणी २ धर्मांधांना अटक

  • २ अल्पवयीन हिंदु मुलींची सुटका !

  • ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी फसवणूक करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा करण्याची भाजपची मागणी

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी

बडनेरा (जिल्हा अमरावती) – येथे १२ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा एकदा ‘लव्ह जिहाद’ची २ प्रकरणे उघडकीस आली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी जुनेद चौधरी आणि अलीम सलीम नौरगाबादी (दोघे रहाणार बडनेरा) या धर्मांधांना अटक केली. (स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! – संपादक) ‘भोळ्या भाबड्या, गरीब आणि निरागस हिंदु मुलींना जाळ्यात ओढून त्यांची ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी फसवणूक करणार्‍या धर्मांधांना कठोर शिक्षा करावी’, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. (भाजपच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये, यासाठी सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – संपादक)

१. यापूर्वी अमरावती जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’च्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यासाठी इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वी मधील हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचे षड्यंत्र धर्मांधांकडून आखले गेले आहे.

२. बडनेरा येथील नव्या वस्तीत शिक्षक वसाहतीच्या वाटिकेत (बागेत) प्रतिदिन आरोपी जुनेद आणि अलीम हे हिंदु अल्पवयीन मुलींसमवेत दुष्कृत्य करत होते. याला वसाहतीतील लोकांनी आक्षेप घेतला.

३. अनेक हिंदु तरुण जमा झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना कह्यात घेतले. आपण ‘लव्ह जिहाद’चे बळी ठरत आहोत’, याचा मागमूसही मुलींना नव्हता. नंतर ‘ब्लॅकमेल’ करून कसे अडकवण्यात आले ? याविषयी मुलींनी पोलिसांना सांगितले.

४. ‘या २ प्रकरणांवरून आणखी ३ अल्पवयीन हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न चालू असल्याची माहिती समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार योजनाबद्ध पद्धतीने चालू आहे’, असा आरोप शिवराय कुळकर्णी यांनी केला आहे. ‘पालकांनी या प्रकरणी अजिबात गाफील राहू नये’, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले आहे.

५. हे प्रकरण उघडकीस येताच हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी बडनेरा पोलीस ठाणे गाठले. यासह दोन्ही निष्पाप मुलींच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.

संपादकीय भूमिका

अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !