पंबाजमधील शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची हत्या करणार्‍या खलिस्तानवाद्यावर शिखांनी उधळली फुले !

अमृतसर (पंजाब) – येथे काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते सुधीर सूरी यांची  खलिस्तानवादी संदीप सिंह याने गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात येत असतांना काही लोकांनी त्याच्यावर फुले उधळली, तसेच काही जणांनी तलवारीही नाचवल्या. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. काही शिखांनी संदीप सिंह याच्या समर्थनार्थ मोर्चाही काढला.

संपादकीय भूमिका

यावरून पंजाबमधील स्थिती किती वाईट झाली आहे, हे स्पष्ट होते ! याला आताच पायबंद घातला नाही, तर भविष्यात निर्माण होणारी भयावह स्थिती निस्तारणे कुठल्याही सरकारच्या आवाक्यात नसेल !