पतंजलीच्या ५ औषधांवर घातलेली बंदी उत्तराखंड सरकारने चूक झाल्याचे सांगत उठवली !

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडच्या भाजप सरकारच्या ‘आयुर्वेद आणि यूनानी अनुज्ञप्ती प्राधिकरणा’ने केरळमधील डॉ. के.व्ही. बाबू यांच्या तक्रारीनंतर खोटे विज्ञापन केल्याचे सांगत योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजलि आस्थापनाच्या दिव्य फार्मसीच्या ५ औषधांवर बंदी घातली होती. आता सरकारने स्वतःची चूक झाल्याचे सांगत ही बंदी उठवली आहे.

याविषयी पतंजलीचे संचालक आचार्य बालकृष्ण यांनी ही माहिती दिली. सरकारकडून बीपीग्रिट, मधुग्रिट, थायरोग्रिट, लिपिडोम आणि आयग्रिट गोल्ड या औषधांवर बंदी घालण्यात आली होती.