मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवासी संतप्त

मध्य रेल्वेच्या विठ्ठलवाडी-कल्याण स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली.

सांताक्रूझ (मुंबई) येथे सनातन प्रभातच्या वाचकांसाठी वाचक मेळावा पार पडला !

सांताक्रूझ (पू.) येथील साईबाबा मंदिरात ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सनातनचे साधक श्री. भरत कडूकर यांनी ‘देशातील विविध वृत्तपत्रांतून हिंदुद्वेष पसरवला जात आहे; मात्र आता ‘सनातन प्रभात’मुळे समीकरण पालटत आहे आणि समाजाला वस्तूस्थिती कळत आहे’, असे मार्गदर्शन केले.

दहिसर मोरी (डोंबिवली) (जिल्हा ठाणे) येथे वाचक मेळावा पार पडला

लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ हे वृत्तपत्र चालू केले, ते स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ! सनातन संस्थेने ही नियतकालिके चालू केली, ती हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याच्या हेतूने, असे वक्तव्य श्री. अजय संभूस यांनी मेळाव्याचा उद्देश सांगतांना केले.

पोलीस कर्मचार्‍यास धक्काबुक्की करणार्‍याला अटक

कर्तव्यावरील पोलीस कर्मचार्‍यास धक्काबुक्की करणारा प्रदीप अंबुरे याला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्याने प्रदीप मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून गेला. पोलीस कर्मचार्‍याने अडवल्यावर त्याने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

शिवसेनेचे आमदार श्री. भरत गोगावले यांना ‘वीर जीवा महाले’ पुरस्कार घोषित

अफझलखानाच्या वधाच्या दिवशी अर्थात शिवप्रतापदिनी प्रतापगड उत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘वीर जीवा महाले पुरस्कार’ महाडचे शिवसेनेचे आमदार श्री. भरत गोगावले यांना देण्याचे घोषित करण्यात आले आहे.

भोईवाडा न्यायालयात न्यायाधिशांसमोर २ आरोपींवर चाकूने आक्रमण करणार्‍याला अटक

एका मारहाणीच्या प्रकरणातील ३ आरोपींना भोईवाडा न्यायालयात उपस्थित करण्यात आले. न्यायालयाने तिघांना जामीन संमत केला; मात्र या वेळी या प्रकरणातील तक्रारदाराने न्यायाधिशांच्या समोरच चाकूने २ आरोपींवर आक्रमण केले.

मेरठमधील निवडणुकीच्या वेळी इव्हीमचे कोणतेही बटण दाबले, तरी भाजपलाच मत जात असल्याचे उघड ?

उत्तरप्रदेशमध्ये स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीतील पहिल्या टप्पाचे मतदान २२ नोव्हेंबरला झाले.

नाभिक समाजाकडून २ डिसेंबरला राज्यभर ‘रास्ता रोको’ आंदोलन

जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत २ डिसेंबरला राज्यभर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

(म्हणे) ‘काश्मीर लवकरच स्वतंत्र होईल !’ – जिहादी आतंकवादी हाफिज सईदची दर्पोक्ती

पाकिस्तानातील पंजाब उच्च न्यायालयाने मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार हाफिज सईद याची नजरबंदीतून सुटका केली. ‘हा पाकचा विजय आहे. भारत सरकार माझे काहीही करू शकत नाही. काश्मीर लवकरच स्वतंत्र होईल’, अशी दर्पोक्ती सईद याने सुटका झाल्यावर केली.

प्रभु श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत ! – भाजपचे नेते शहानवाज हुसेन

प्रभु श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे सर्वांसाठी लाभदायक आहे. प्रभु श्रीरामांनी त्यांच्या जीवनामध्ये उच्च मर्यादा पाळल्याने ते सर्वांचे आहेत, असे प्रतिपादन भाजपचे नेते शहानवाज हुसेन यांनी केले. इंडोनेशियामध्ये प्रभु श्रीरामांच्या जीवनावर आधारित रामलीला सादर केली जाते.


Multi Language |Offline reading | PDF