उदयपूर-अहमदाबाद रेल्वे रुळावर स्फोट : दारुगोळाही आढळला

१३ दिवांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी केले होते या मार्गाचे लोकार्पण !

उदयपूर (राजस्थान) – येथे उदयपूर-अहमदाबाद रेल्वेमार्ग स्फोटकांद्वारे उडवून देण्यात आला. या स्फोटामुळे रुळ दुभंगले गेले. येथे दारुगोळाही सापडला आहे. विशेष म्हणजे स्फोटाच्या ४ घंटे पूर्वी या रुळावरून एक रेल्वे गाडी गेली होती. ‘स्फोटाचा आवाज फार मोठा होता’, असे स्थानिकांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ ऑक्टोबर या दिवशीच या रेल्वे मार्गाचे लोकार्पण केले होते. स्फोटानंतर कर्णावतीहून उदयपूरला येणारी रेल्वे डुंगरपूरलाच थांबवण्यात आली आहे. या घटनेमागे कुणाचा हात आहे ?, याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी या घटनेमागे गुंडांचा हात असल्याचे म्हटले आहे; पण घटनेचे सर्वच अंगांनी अन्वेषण केले जात आहे.