केरळच्या इस्लामी संस्थेत शिकवली जातात गीता आणि उपनिषदे !

प्राचार्य ओनमपिल्ली महंमद फैझी

त्रिशूर (केरळ) – येथील एका इस्लामी संस्थेमध्ये शिकणारे मुसलमान विद्यार्थी हिंदु गुरूंच्या देखरेखीखाली संस्कृत श्लोक आणि मंत्र शिकतात. गुरु आणि शिष्य यांच्यातील संभाषणही संस्कृतमध्येच होते. ‘मलिक दीनार इस्लामिक कॉम्प्लेक्स’ (एम्.आय.सी.) द्वारे संचालित ‘अकॅडमी ऑफ शरिया अँड ॲडव्हान्स्ड स्टडीज’चे प्राचार्य ओनमपिल्ली महंमद फैझी म्हणतात की, संस्कृत उपनिषद, पुराणे, ग्रंथ इत्यादी शिकवण्यामागील उद्देश हाच आहे की, विद्यर्थ्यांना इतर धर्मांविषयी ज्ञान आणि जागरूकता निर्माण झाली पाहिजे.

‘एम्.आय.सी.’मध्ये विद्यार्थी संस्कृतमध्येच बोलतांना दिसतात. संस्थेचे प्राचार्य म्हणाले की, या विद्यार्थ्यांना दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आठ वर्षांपर्यंत भगवद्गीता, उपनिषदे, रामायण, महाभारत यांतील महत्त्वाचे भागही शिकवले जातात.

________________________ 

संपादकीय भूमिका

धर्मांध मुसलमानांनी आता या इस्लामी संस्थेच्या स्तुत्य अभ्यासक्रमावर आगपाखड करायला आरंभ केल्यास आश्चर्य वाटू नये !