हिंदु समाज धर्मांतरासाठी कधीही कुणावर बळजोरी करत नाही ! – आमदार नीतेश राणे, भाजप

नितेश राणेंचा पलटवार !

मुंबई – लव्ह जिहादमध्ये हिंदु मुलींची फसवणूक होते. खोटे बोलून त्यांच्याशी लग्न केले जाते आणि त्यांना चुकीच्या मार्गावर नेले जाते. एखाद्या हिंदु युवकाने मुसलमान युवतीशी लग्न केल्यावर धर्मांतरासाठी तिच्यावर बळजोरी केल्याचे एकतरी उदाहरण अबू आझमी यांनी दाखवावे.

हिंदु समाज धर्मांतरासाठी कधीही कुणावर बळजोरी करत नाही, असे वक्तव्य भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ‘मुसलमान तरुणांनी हिंदु मुलीशी लग्न केले, तर ‘लव्ह जिहाद’ म्हणतात, मग मुसलमान तरुणींनी हिंदु मुलासमवेत लग्न केले, तर त्याला ‘लव्ह जिहाद’ म्हणणार का ?’, अशी विचारणा एका सार्वजनिक कार्यक्रमात केली. त्यावर वरील उत्तर देणारा व्हिडिओ नीतेश राणे यांनी ‘ट्वीट’ केला आहे.