आतंकवादाला पोषण देणार्‍यांची संपूर्ण यंत्रणा नष्ट करणे आवश्यक ! – डॉ. एस्. जयशंकर, परराष्ट्रमंत्री

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर हे सध्या इंडोनेशियाच्या दौर्‍यावर आहेत. येथे ते दक्षिण पूर्व आशियाई देशांच्या ‘आसियान’ गटाच्या परिषदेला संबोधित करण्यासाठी आले आहेत.

इस्लामी इंडोनेशियात अविवाहित जोडप्याने चुंबन घेतल्याने प्रत्येकी २१ कोड्यांची शिक्षा !

कोडे मारत असतांना युवती एकाएकी खाली कोसळली, तसेच ‘मला मारू नये’, अशी विनवणी करू लागली. मूलत: २५ कोडे मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. नंतर ती अल्प करून २१ करण्यात आली.

बाली (इंडोनेशिया) येथे जर्मनीच्या महिलेचा नग्न होऊन मंदिरात प्रवेश

एका हिंदु मंदिरामध्ये नग्नावस्थेत प्रवेश करणार्‍या जर्मनीच्या महिला पर्यटकाला अटक करण्यात आली आहे. तिला मानसोपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

मुसलमानांनी ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत ‘ख्रिसमस’च्या शुभेच्छा देऊ नयेत ! – इंडोनेशियाचे मौलवी मारूफ अमीन

हिंदु धर्मीय सोडून अन्य पंथीयांचे धर्मगुरु त्यांना त्यांच्या पंथांनुसार नियमांचे पालन करायला सांगतात. हिंदूंना मात्र सर्वधर्मसमभावाची शिकवण दिल्यामुळे ते धर्मपालन करत नाहीत उलट धर्मविरोधी कृत्ये करण्यास धन्यता मानतात !

इंडोनेशियामधील भूकंपामध्ये ४६ जण ठार, ७०० हून अधिक जण घायाळ

जकार्ता येथे झालेल्या भूकंपामध्ये आतापर्यंत ४६ जण ठार झाले आहेत, तर ७०० हून अधिक लोक घायाळ झाल्याचे वृत्त आहे.

३ सहस्र भारतीय तरुणांना नोकरी आणि व्यवसाय यांसाठी व्हिसा देणार !

‘जी-२०’ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा झाली. या भेटीनंतर ब्रिटन सरकारने भारतासाठी ३ सहस्र व्हिसा जारी करण्याची घोषणा एका योजनेद्वारे केली.

रशियाच्या विरोधातील प्रस्तावाला भारतासह अनेक देशांचा विरोध

जी-२० शिखर परिषद

इंडोनेशियामध्ये फूटबॉल सामन्यानंतर झालेल्या हिंसाचारात १२९ जणांचा मृत्यू

यात सामना पहायला आलेल्या अनेक प्रेक्षकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये २ पोलिसांचाही समावेश आहे.

जकार्ता समुद्रात बुडण्याच्या शक्यतेने इंडोनेशिया नुसंताराला बनवणार राजधानी !

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता  पुढील काही वर्षांत समुद्रात पूर्णतः बुडण्याची शक्यता असल्याने इंडोनेशियाने राजधानी पालटण्याचा निर्णय घेत नुसंतारा हे शहर यापुढे राजधानी करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडोनेशियातील मुसलमानांना हिंदु धर्माचे आकर्षण !

एकट्या बाली बेटावर २० सहस्रांहून अधिक मंदिरे आहेत, जी स्वत:च एक मोठी गोष्ट आहे. याशिवाय जकार्ता आणि अन्य बेटांवरही अशी अनेक मंदिरे शोधण्यात आली आहेत. त्यामुळे इंडोनेशियाचे मुसलमान सातत्याने हिंदु धर्माशी संबंध अनुभवत आहेत. हाच अनुभव त्यांना हिंदु धर्मामध्ये परतण्याची प्रेरणा देत आहे.