मुसलमानांनी ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत ‘ख्रिसमस’च्या शुभेच्छा देऊ नयेत ! – इंडोनेशियाचे मौलवी मारूफ अमीन

(मौलवी म्हणजे इस्लामचे धार्मिक नेते)

प्रतिकात्मक छायाचित्र

जकार्ता – मुसलमानांनी ‘मेरी ख्रिसमस’ म्हणत ‘ख्रिसमस’च्या शुभेच्छा देऊ नयेत, असे इंडोनेशियाचे मौलवी मारूफ अमीन यांनी म्हटले आहे. एका वृत्तानुसार मौलवी मारूफ अमीन हे इंडोनेशियातील इस्लामिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. मौलवीने अमीन म्हणाले, ‘‘मुसलमानांनी त्यांच्या अन्य बांधवांना ‘मेरी ख्रिसमस’च्या शुभेच्छा देण्यापासून परावृत्त केले पाहिजे. मुसलमानांसाठी ‘ख्रिसमस पार्टी’ किंवा उत्सवाला उपस्थित रहाणे ‘हराम’ (इस्लामला निषिद्ध)आहे.’’

मौलवींनी कुराणाचा संदर्भ देऊन ‘मेरी ख्रिसमस’ म्हणणे ‘हराम’ असल्याचे म्हटले आहे. ख्रिसमसच्या आधी ‘द इस्लामिक इन्फॉर्मेशन’ने प्रकाशित केलेल्या आणखी एका अहवालात, ‘ख्रिसमस’सह कोणताही मुसलमानेतर सण साजरा करणे इस्लाममध्ये ‘हराम’ आहे. ख्रिस्ती लोक येशूचा (देवाचा पुत्र) जन्म साजरा करतात. हे इस्लामच्या विरोधात आहे. हा इस्लाममधील सर्वात दंडनीय गुन्ह्यांपैकी एक आहे’, असे नमूद करण्यात आले आहे. ‘ख्रिसमस’ साजरा करण्यास मनाई करणार्‍या कुराणातील आयतांचाही (वाक्यांचाही) अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदु धर्मीय सोडून अन्य पंथीयांचे धर्मगुरु त्यांना त्यांच्या पंथांनुसार नियमांचे पालन करायला सांगतात. हिंदूंना मात्र सर्वधर्मसमभावाची शिकवण दिल्यामुळे ते धर्मपालन करत नाहीत उलट धर्मविरोधी कृत्ये करण्यास धन्यता मानतात !