इस्लामी इंडोनेशियात अविवाहित जोडप्याने चुंबन घेतल्याने प्रत्येकी २१ कोड्यांची शिक्षा !

जकार्ता (इंडोनेशिया) – येथील सुमात्रा द्विपावर असलेल्या एका शहरामध्ये एका अविवाहित जोडप्याला २१-२१ कोडे मारण्याची शिक्षा देण्यात आली. दोघेही एका चारचाकी वाहनात चुंबन घेत असल्यामुळे त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. युवतीचे वय २३ वर्षे असून युवक २४ वर्षांचा आहे. दोघांना शरीयत कायद्यानुसार शिक्षा देण्यात आली.

कोडे मारत असतांना युवती एकाएकी खाली कोसळली, तसेच ‘मला मारू नये’, अशी विनवणी करू लागली. मूलत: २५ कोडे मारण्याची शिक्षा देण्यात आली होती. नंतर ती अल्प करून २१ करण्यात आली. दोघांना मारहाण चालू असतांना लोक घटनेचे चित्रीकरण करत होते. स्थानिक सरकारी अधिकार्‍याने सांगितले की, दोघांनी ‘जिनायत’ म्हणजेच इस्लामी कायद्याचे उल्लंघन केले आहे.

इंडोनेशियातील ९० टक्के लोक हे इस्लाम धर्माचे पालन करतात. देशातील काही राज्यांमध्ये शरीयत कायदा कठोरतेने अवलंबला जातो. यांतर्गतच जोडप्यांना सार्वजनिक जागेत जवळ येण्यावर प्रतिबंध आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंना पुरोगामीपणाचा डोस पाजणारे कथित आधुनिकतावादी आता या घटनेवर मौन का ?