बनावट नोटा चलनात आणणारी टोळी जेरबंद

अशा राष्ट्रद्रोहींना नेमकी फूस कोणाची आहे, त्याची पाळेमुळेही शोधली पाहिजेत !

पू. भिडेगुरुजी यांना वढू (पुणे) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी थांबण्यास पोलिसांकडून मज्जाव

छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ९ जानेवारी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. भिडेगुरुजी हे वढु बुद्रुक या ठिकाणी मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ट्वीट करणार्‍या वैमानिकाला ‘गोएअर’ने कामावरून काढले !

या ट्वीटवरून वाद झाल्याने मलिक यांनी ते डिलीट करत क्षमायाचनाही केली होती. ‘ट्वीटमधून व्यक्त करण्यात आलेली मते वैयक्तिक होती. त्यांच्याशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या गोएअरचा कोणताही संबंध नाही’, अशी क्षमा त्यांनी मागितली होती.

मास्क न वापरणार्‍यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गोव्यातील जनतेची मागणी

सध्या गोव्यात अनेक पर्यटक येत आहेत. कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर मास्क वापरण्यासंबंधीचे नियम अनेक पर्यटक आणि काही स्थानिक पाळत नसल्याने मास्क न वापरणार्‍यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी गोव्यातील बहुतांश नागरिकांकडून होत आहे.

सामाजिक आणि देशप्रेमी घटनांविषयी सिंधुदुर्ग संवेदनशील जिल्हा !  – डॉ. राजेंद्र दाभाडे, पोलीस अधीक्षक

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या निसर्गसंपन्न जिल्हा म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो. विविध राजकीय पक्षांमध्ये येथील मतदार विभागला गेला आहे. तरीही राजकीय, सामाजिक सलोखा कायम आहे.

सोलापूर येथील श्री सिद्धरामेश्‍वर मंदिराच्या परिसरात जमावबंदीचा आदेश

यात्राकाळात केवळ पासधारक भाविकांनाच धार्मिक विधीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येईल. लोकप्रतिनिधी आणि अतीमहनीय व्यक्ती यांनाही यात्राकाळात प्रवेश देण्यात येणार नाही. ग्रामीण भागातून यात्रेसाठी भाविकांनी शहरात येऊ नये यासाठी शहर आणि ग्रामीण पोलीस यांंच्या संयुक्त पथकांद्वारे शहराभोवती नाकाबंदी करण्यात येणार आहे

केंद्राकडून शिष्यवृत्तीसाठी ५९ सहस्र कोटी रुपयांची तरतूद ! – सुनील कांबळे, भाजप

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने ५९ सहस्र रुपयांची तरतूद केली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. असे असतांना विरोधक केंद्र सरकारवर खोटा आरोप करत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनिल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केले.

बीड जिल्ह्यात २ दिवसांत २६ कावळ्यांचा मृत्यू

देशातील ६ राज्यांमध्ये ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट होत असतांना पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे २ दिवसांत २६ कावळे मृतावस्थेत आढळले आहेत.

नव्या धोरणानुसार आमदार वैभव नाईक यांना ‘एक्स’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था

राज्य सरकारने राज्यातील राजकीय नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत पालट केला असतांनाच काही नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ, तर काही नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्यात आली आहे.

अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे

मार्च मासाच्या अखेरीस नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे आगामी ९४ वे मराठी साहित्य संमेलन होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी संभाजीनगरमध्ये ८ जानेवारी या दिवशी केली.