पू. भिडेगुरुजी यांना वढू (पुणे) येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी थांबण्यास पोलिसांकडून मज्जाव

पुणे – छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी ९ जानेवारी या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. भिडेगुरुजी हे वढु बुद्रुक या ठिकाणी मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत आले होते. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी त्यांना समाधीस्थळी थांबण्यास मज्जाव केला. त्यानंतर त्यांनी समाधीस्थळावरून मार्गस्थ होत शिरूर तालुक्यातील वाजेवाडी येथे एका दुर्घटनाग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आणि पुण्याकडे निघाले.

कोरेगाव भीमा आणि वढू बुद्रुक येथे येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीची आणि घटनेची गोपनीय माहिती संकलित करण्याचे काम चालू असल्याने या परिसरात पू. भिडेगुरुजींना थांबण्यास मज्जाव करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांनी दिली.