कुडाळ (सिंधुदुर्ग) – सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या निसर्गसंपन्न जिल्हा म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो. विविध राजकीय पक्षांमध्ये येथील मतदार विभागला गेला आहे. तरीही राजकीय, सामाजिक सलोखा कायम आहे. सामाजिक आणि देशप्रेमी घटनांच्या संदर्भात अतिशय संवेदनशील अन् सहकार्यशील जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाची ओळख आहे, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी केले.
जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय आव्हाने पेलण्यासाठी बळ देण्याच्या उद्देशाने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी त्यांच्या सहकार्यांसह डॉ. दाभाडे यांची जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.