वैभववाडी – तालुक्यातील लोरे क्रमांक २, दुधमवाडी येथील लवू वसंत मांडवकर हे शेतात काम करत असतांना अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला होता. ही घटना २७ जून २०२० या दिवशी घडली होती. याची ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून नोंद झाली होती, तसेच आपत्तीग्रस्त कुटुंबाला साहाय्य मिळावे, यासाठी संबंधित विभागाकडून शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला होता. हा प्रस्ताव संमत होऊन मांडवकर यांच्या कुटुंबियांना ४ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य शासनाकडून देण्यात आले. या रकमेचा धनादेश वैभववाडीचे तहसीलदार रामदास झळके यांनी मांडवकर यांच्या पत्नी श्रीमती रुचिका मांडवकर यांच्याकडे सुपुर्द केला.