देहलीमध्ये सार्वजनिक ठिकाणी छठ पूजा करण्यास देहली उच्च न्यायालयाने अनुमती नाकारली !

नवी देहली – कोरोनाच्या संकटामुळे देहली उच्च न्यायालयाने यमुना नदीच्या घाटांवर छठ पूजा करण्याची अनुमती नाकारली आहे. न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही धर्माचा सण साजरा करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम जीवित रहायला हवे.

१. देहलीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने स्पष्ट केले आहे की, छठ पूजेमुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी होण्याचा धोका असल्याने यासाठी अनुमती देता येणार नाही.

२. छठ पूजा करणार्‍या समित्यांनी, तसेच भाजपने सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.