अल्पवयीन मुलीकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या युवकाला अटक

वेंगुर्ले – अल्पवयीन मुलीच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी एका युवकाला निवती पोलिसांनी अटक केली आहे. याविषयी संबंधित मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार त्या युवकावर ‘पॉक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद केला होता.