सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्रकिनार्‍यावरील जलक्रीडा प्रकार चालू करण्यास अनुमती ! – जिल्हाधिकारी

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत पर्यटन क्षेत्र, तीर्थस्थळे, प्रार्थनास्थळे चालू करण्यास अनुमती देण्यात आली आहे, तसेच उपाहारगृहे, रेस्टॉरंट यांसह खासगी वाहतुकीसही अनुमती देण्यात आली आहे.

गोव्यात आजपासून १० वी आणि १२ वीच्या वर्गांना प्रारंभ

राज्यातील १० आणि १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी नियमित वर्गांना २१ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. बहुतेक विद्यालयांनी विद्यार्थ्यांना गटागटांमध्ये विद्यालयात येण्याची सूचना केली आहे

कॅसिनो धक्क्याजवळ बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांच्या विरोधात पणजी महानगरपालिकेची कारवाई चालूच

पणजी महानगरपालिकेने कारवाई करतांना ‘पार्किंग निषिद्ध’ असलेल्या विभागात उभी केलेली अनेक दुचाकी वाहने कह्यात घेतली आहेत, तसेच चारचाकी वाहनांना ‘क्लॅम्प’ लावण्यात आले आहेत.

मालवाहक वाहनाच्या चोरीचा पर्दाफाश

झाराप येथील गंगाराम रेडकर यांच्या मालकीची बोलेरो पिकअप वाहन क्र. एम्एच् ७ पी २६११ ही बालाजी मार्बल, कुडाळ येथून अज्ञात चोरट्याने चोरली होती. याविषयी कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ घंट्यांत कोरोनाचे नवीन ८ रुग्ण

जिल्ह्यात २४ घंट्यांत कोरोनाचे नवीन ८ रुग्ण आढळले असून एकूण ४ सहस्र ८३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या जिल्ह्यात १४४ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

निधन वार्ता

सनातन संस्थेच्या साधिका निलावती शेलार यांचे सासरे हणमंता शेलार (वय ८० वर्षे) यांचे ९ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.

फेरीसेवा शुल्कात वाढ केल्याच्या प्रकरणी चोडण-माडेल पंचायत न्यायालयात

राज्यात रात्रीच्या वेळी उपलब्ध असलेल्या विशेष फेरीसेवेच्या शुल्कात ५ पटींनी वाढ केल्याच्या प्रकरणी चोडण-माडेल पंचायत आणि काही ग्रामस्थ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे.

प्रशासनाच्या विरोधात साईप्रसाद कल्याणकर यांचे लाक्षणिक उपोषण

तालुक्यातील बांदा-सटमटवाडी येथील सीमा तपासणी नाक्याच्या ३२ एकरातील बांधकामासाठी बिनशेतीची अनुमती घेतली नसतांना ग्रामपंचायत, तलाठी, तहसीलदार, नगर रचनाकार सिंधुदुर्ग यांच्याकडून हे अवैध बांधकाम होत असतांना कानाडोळा केला जात आहे.

वाढीव वीजदेयकांच्या विरोधात भाजपाचे कणकवली येथे आंदोलन

वाढीव वीजदेयकांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून महावितरण आणि राज्यसरकार यांचा निषेध केला.

कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन ७ डिसेंबरपासून बेंगळुरू येथे

कर्नाटक राज्यातील विधानसभेचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबर ते १५ डिसेंबर या काळात बेंगळुरू येथे होणार आहे.