कणकवलीत भटक्या कुत्र्यांवर नगरपंचायतीची उपाययोजना

कणकवली – कणकवली नगरपंचायत क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव गेले काही दिवस वाढला आहे. यासाठी नगरपंचायतीच्या वतीने कृती आराखडा सिद्ध करण्यात आला आहे. कणकवलीतील भटके कुत्रे पकडून त्या कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करून पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येणार आहे. यासाठी २ ‘एजन्सी’नी नगरपंचायतशी संपर्क साधला आहे. याची निविदा प्रक्रिया लवकरच करण्यात येईल, अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.