Shivamogga Muslim Girl Beaten Up : हिंदु मुलासमवेत फिरल्याने मुसलमान मुलीला इस्लामी कट्टरवाद्यांकडून मारहाण !

एरव्ही हिंदूंना ‘कट्टरतावादी’ ठरवणारे पुरोगामी आता या धर्मांधांना ‘कट्टरतावादी’ का ठरवत नाहीत ?

पुणे येथे नाकाबंदीत ५ कोटी ७३ लाख रुपयांचे सोने आणि चांदी सापडली !

विधानसभा निवडणुकीच्या वेळी नाकाबंदीमध्ये मुंबईहून पुण्यातील सराफ व्यावसायिकांना पाठवण्यात आलेली ४ कोटी १६ लाख रुपयांची ४ किलो ४७९ ग्रॅम चांदी, तसेच १ कोटी ५७ लाख रुपयांचे २ किलो ५११ ग्रॅम सोने असा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

काँग्रेसने देशाच्या आर्थिक धोरणाला धक्का दिल्यामुळे देशाची हानी ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

भाजपचे उमेदवार आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ येथील किसान चौक येथे १६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ४ वाजता आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

खामगाव येथे धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट प्रसारित; ७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

शहरातील ‘सतीफैल काँग्रेस’ नावाच्या सामाजिक माध्यमांवरील गटावर तुषार चंदेल याने ‘खामगाव येथे काँग्रेसच्या प्रचारासाठी येणारे खासदार इमरान प्रतापगढी यांच्या ‘रोड शो’वर दगडफेक होईल’, अशी अफवा पसरवणारी पोस्ट प्रसारित केली.

शरद पवार काय आहेत, हे लोकांना ठाऊक आहे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

हे लोकांना ठाऊक आहे. मला त्यावर बोलायचे नाही. त्यांनी ज्या मौलाना नोमानींचा पाठिंबा घेतला आहे, त्यांच्या १७ मागण्या मान्य केल्या, त्या नोमानींनी सांगितले की, ‘व्होट जिहाद’ होईल,  असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. 

काँग्रेससाठी देश कधीच महत्त्वाचा नव्हता ! – योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तरप्रदेश

खर्गे यांनी लोकांना खरा इतिहास सांगून निजाम कोण होता, ते सांगितले पाहिजे, असे प्रतिपादन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते कोल्हापूर येथे तपोवन मैदानावर आयोजित सभेत बोलत होते.

महाराष्ट्र दौरा अचानक रहित करून अमित शहा देहलीत !

अमित शहा यांच्या गडचिरोली, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांतील काटोल अन् सावनेर या मतदारसंघात होणार्‍या ४ सभा रहित करण्यात आल्या आहेत.

देव, देश आणि धर्म यांसाठी स्वतः धर्माचरणी होऊन समाजाला संघटित करायला हवे ! – महेश लाड, हिंदु जनजागृती समिती

देशातील हिंदूंची स्थिती पहाता आपण सर्वांनी संघटित होण्याची नितांत आवश्यकता आहे. राष्ट्र आणि धर्म रक्षण हे प्रत्येक हिंदु युवक-युवती यांचे दायित्व आहे.

वाळकेश्वर येथे २५ सहस्रांहून अधिक भािवकांकडून बाणगंगेची महाआरती !

१५ नोव्हेंबर या दिवशी ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगेची कार्तिक पौर्णिमेला २५ सहस्रांहून अधिक भाविकांनी एकत्रित महाआरती केली.

दिवा येथे आयोजित गडदुर्ग बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला !

तरुणांमध्ये गडदुर्गांविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी ‘मराठा वॉरियर्स गडकिल्ले संवर्धक’ संघटनेच्या वतीने दिवाळीच्या काळात दिवा शहरात गडदुर्ग बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात येते.