छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा ‘वक्‍फ कायदा’ रहित करा !

नांदेड आणि परभणी येथे हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने प्रशासनास निवेदन !

नांदेड येथील अप्‍पर जिल्‍हाधिकारी पी.एस्. बोरगावकर यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

नांदेड, २० जुलै (वार्ता.) – छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी हडपणारा वफ्‍क कायदा रहित करण्‍यात यावा, या मागणीसाठी १७ जुलै या दिवशी परभणी येथील उपजिल्‍हाधिकारी श्रीमती स्‍वाती दाभाडे आणि नांदेड येथील अप्‍पर जिल्‍हाधिकारी पी.एस्. बोरगावकर यांना निवेदन देण्‍यात आले.

परभणी येथील उपजिल्‍हाधिकारी श्रीमती स्‍वाती दाभाडे यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते

छत्रपती शाहू महाराजांनी मुसलमान तथा अन्‍य समाजातील विद्यार्थ्‍यांच्‍या शिक्षणासाठी कोल्‍हापूर येथे स्‍थापन केलेल्‍या ‘द मोहामेडन एज्‍युकेशन सोसायटी’ची कोट्यवधी रुपयांची संपत्ती बळकावण्‍याची प्रक्रिया वक्‍फ बोर्डाने चालू केली आहे. त्‍यामुळे समाजात संतापाची लाट पसरली आहे. अशा प्रकारे वक्‍फ बोर्डाने देशातील लाखो एकर भूमी हडपली आहे. त्‍यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची भूमी ‘लँड जिहाद’द्वारे हडपणारा ‘वक्‍फ’चा काळा कायदा रहित करण्‍यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्‍यात आली.

या वेळी सर्वश्री महेश काळे, मंदार कुलकर्णी, श्रीनिवास लाहोटी, अमोल देशमुख, श्रीनिवास दिवाण, उदय बडगुजर आदी उपस्‍थित होते.