मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामांतर ‘नाना शंकरशेठ’ असे करण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर संमत करावा ! – खासदार अरविंद सावंत, शिवसेना

मुंबई सेंट्रल टर्मिनसला ‘नाना शंकरशेठ’ यांचे नाव देण्याची मागणी फार जुनी आहे.

वणी पोलिसांकडून गोवंश तस्करी करणारी ५ वाहने जप्त आणि ८ जणांना अटक

वणीमार्गे तेलंगणा राज्यात गोवंश तस्करी पुष्कळ प्रमाणात वाढलेली आहे. याविषयी गुप्त माहिती वणी पोलिसांना मिळाल्यावरून बायपास मार्गावर सापळा लावून ५ वाहनात कोंबून भरलेला २९ नग गोवंश सोडवला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन सोशल मीडिया प्रगत प्रशिक्षण शिबीर’ पार पडले 

जगभरामध्ये हिंदु धर्माची होत असलेली हानी थांबवण्यासाठी, तसेच धर्म, संस्कृती, हिंदु राष्ट्र यांच्या विचारांंच्या प्रसारासाठी सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३ जानेवारी या दिवशी विदर्भस्तरीय ‘ऑनलाईन सोशल मीडिया प्रगत प्रशिक्षण’ शिबिराचे आयोजन करण्यात आले.

राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे आठ रुग्ण

राज्यात कोरोनाच्या नव्या प्रकाराचे सध्या आठ रुग्ण असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध चालू आहे. लसीकरणासाठी सूची काढण्याचा आदेश जिल्ह्यांना दिला आहे.

पारपत्राचा कालावधी संपूनही ४ लाख २१ सहस्र २५५ विदेशींचा भारतात अवैधरित्या निवास, शोध घेण्यासाठी महाराष्ट्रात समितीची स्थापना

अधिकृत पारपत्राद्वारे देशात प्रवेश करून त्यानंतर अवैध वास्तव्य करणार्‍या विदेशींची इतकी संख्या असेल, तर भारतात घुसखोरी करणारे किती बांगलादेशी असतील !

जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतींसाठी १ सहस्र ९० उमेदवार रिंगणात : ४ ग्रामपंचायती बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणुकीसाठीही दंगल नियंत्रण पथक तैनात करणे आणि पोलिसांनी संचलन करणे, या गोष्टी कराव्या लागणारी निरर्थक लोकशाही !

कोरोनावरील लस २०० रुपयांमध्ये शासनाला उपलब्ध करून देणार ! – आदर पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

‘कोरोनाशिल्ड’ ही लस खासगी रुग्णालयांसाठी १ सहस्र रुपये, तर शासनासाठी २०० रुपयांना उपलब्ध करून देणार आहोत – सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला

मुंबई डबावाले असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक

कर्ज देण्याविषयी खोटे आश्‍वासन देऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणी मुंबई डबावाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना ४ जानेवारी या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

कुडाळ येथे दीड लाख रुपयांच्या गुटख्यासह ४ जण पोलिसांच्या कह्यात

भाजीच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक करणार्‍या टोळीचे बिंग ४ जानेवारीला रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत उघड झाले. या वेळी पोलिसांनी चौघांना कह्यात घेतले आहे.

चिपी विमानतळाला भंगसाळ नदीचे पाणी देण्यास कुडाळ शहर सुधार समितीचा विरोध

भविष्यात कुडाळ शहर, तसेच येथील एम्.आय.डी.सी.मध्ये पाण्याची टंचाई भासणार आहे. त्यामुळे चिपी विमानतळास पाणीपुरवठा करू नये, असे निवेदन सुधार समितीचे सदस्य आणि शहरातील नागरिक यांच्या शिष्टमंडळाने दिले.