मुंबई डबावाले असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक

मुंबई डबावाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक करतांना पोलीस

मुंबई – कर्ज देण्याविषयी खोटे आश्‍वासन देऊन फसवणूक केल्याच्या प्रकरणी मुंबई डबावाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना ४ जानेवारी या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वर्ष २०२० मध्ये मुंबई जीवन डबे वाहतूक मंडळ या डबेवाल्यांच्या संघटनेतील २२ डबेवाल्यांना दुचाकी घेण्यासाठी तळेकर आणि त्यांचे सहकारी यांनी कर्ज घेतले; मात्र दुचाकी दिल्या नाहीत, अशी तक्रार संघटनेच्या डबेवाल्यांनी केली.