आज पत्रकार दिनानिमित्त वाशी येथे परिसंवादाचे आयोजन

दर्पणकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारीला परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सरपंचपदाच्या निवडीसाठी होत असलेल्या लिलावाच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोग जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल घेणार

सरपंचपदासाठी पैशांची बोली लागणे ही लोकशाहीची थट्टा !

राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशीची शक्यता

राज्याच्या कृषी विभागाची सक्तवसुली संचालनालयाच्या माध्यमातून चौकशी होण्याची शक्यता आहे. राज्यात वर्ष २००८ ते २०११ या कालावधीत कृषी विभागाच्या सूक्ष्म सिंचन योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला होता.

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात ‘ड्रोन’सह ‘रिमोट कंट्रोल’वर चालणारी उपकरणे वापरण्यावर बंदी

मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात ‘ड्रोन’, ‘पॅराग्लायडर्स’ यांसह रिमोट कंट्रोलवर चालणार्‍या ‘मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, एरियएल मिसाईल’ आदी यंत्रणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे

निधन वार्ता  

भोसरी येथील सनातनचे साधक श्री. योगेश यशवंतराव सुभेदार यांची आई कै.पुष्पा यशवंतराव सुभेदार (वय ५७ वर्षे) यांचे ३ जानेवारीला मध्यरात्री १.३० वाजता आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती,२ मुले,१ सुन,१ मुलगी,१ नात असा परिवार आहे

कोरोनावरील लस देण्यासाठी मुंबईत जम्बो लसीकरण केंद्रे उभारणार ! – सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगरपालिका

मुंबईमध्ये ज्या ठिकाणी जम्बो कोरोना सेंटर उभारण्यात आले होते, त्या ठिकाणी आता जम्बो लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहेत. अशा प्रकारची १०० केंद्रे उभारण्याचे नियोजन आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससीच्या) परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याच्या कमाल संधी मर्यादेचा नियम अन्यायकारक ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यात कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे ‘करियर’ धोक्यात येणार आहे.

सातारारोड-पाडळी (जिल्हा सातारा) येथे सैनिकाची आत्महत्या

सैनिक भगतराम जगदाळे यांनी घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

भोंदवडे आणि आंबवडे गावांचा सर्व निवडणुकांवर बहिष्कार

प्रशासकीय मतदारसूचीतच सावळा गोंधळ होत असेल, तर निवडणूक योग्य प्रकारे कशी पार पडणार ?

पीडित महिलेवर बहिष्कार टाकणार्‍या गावांवर प्रशासक नेमा !

गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील एका महिलेवर वर्ष २०१५ मध्ये ४ जणांनी दोन वेळा सामूहिक बलात्कार केला.