माघ एकादशी निमित्त ४ लाखांहून अधिक भाविकांनी घेतले श्री विठ्ठलाचे दर्शन !
माघ शुक्ल जया एकादशीनिमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा पार पडली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ; तर रुक्मिणीमातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.